Home क्राईम जुन्या वादातून प्रौढाला दोघांची बेदम मारहाण

जुन्या वादातून प्रौढाला दोघांची बेदम मारहाण


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका प्रौढ व्यक्तीला शेजारी राहणाऱ्या दोन जणांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरीष रामकिशन नन्नवरे वय ४६ रा. सिध्दार्थ नगर, पाळधी ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ते एसटी महामंडळात कामाला आहे. दरम्यान, मंगळवारी २० जानेवारी रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारे अजय सुधीर नन्नवरे आणि तुषार सुधीर नन्नवरे रा. सिध्दार्थ नगर, जळगाव यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शिरीष नन्नवरे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अजय नन्नवरे आणि तुषार नन्नवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेश नाईक हे करती आहे.


Protected Content

Play sound