जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरातील जानकी नगरात राहणाऱ्या ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश रमेश निकम (वय-४५) रा. चाळीसगाव ह.मु. जानकी नगर, तुकाराम वाडी, जळगाव असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश रमेश निकम हा पत्नी व सहा वर्षाचा मुलगा यांच्यासोबत गेल्या चार वर्षापासून तुकाराम वाडीतील जानकी नगरात वास्तव्याला होता. फर्निचरचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी योगेश निकम यांची पत्नी कामाला बाहेर गेल्या होत्या त्यावेळी योगेश हा घरी एकटाच होता. सायंकाळी ६ वाजून २० मिनीटांपुर्वी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या तरूणांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील पतास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे. मयताच्या पश्चात आई कोकीळा, वडील रमेश पंडीत निकम, पत्नी, सहा वर्षा मुलगा समर्थ, लहान भाऊ उमेश आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.