
चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रात ४५ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यशवंत फकिरा निकाळजे वय ४५ रा. संबोधी ता. धुळे असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत निकाळजे हे आपल्या कुटुंबासह धुळे जिल्ह्यातील संबोधी गावातील राहत होते. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रात त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ४ फेब्रुवारी समोर आले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेवून त्यांचा मृतदेह मेहुणबारे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले.



