मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमृता फडणवीस यांचे शिवतांडव स्तोत्र आज टाईम्स म्युझिकने रिलीज केल्यानंतर सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचं नवं गाणं आता थो़ड्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अवघ्या काही तासांत एवढ्या मोठ्या प्रमाणात व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले आहे. काल त्यांच्या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यालाही चाहते आणि नेटकर्यांचा प्रतिसाद मिळाला होता. अमृता फडणवीस सातत्याने चर्चेत असतात. विशेष करून त्या सोशल मीडियात सक्रीय असतात.
अमृता फडणवीस यांची अनेक गाणी आधी देखील प्रसिध्द झाली असतांना आज शिवतांडव स्त्रोत्र रिलीज करण्यात आले आहे. ’जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले’ असं कॅप्शन त्यांनी पोस्टरला दिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, भक्ती ही दुर्मिळ आणि एक आकर्षक अशी आध्यात्मिक यात्रा आहे! २४ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या आयुष्यातील सर्वात दैवी संगीतमय अनुभव रिलीज होत आहे, असं त्यांनी म्हटलय.
अमृता फडणवीस यांनी महाशिवरात्रीपर्यंत नवा मुझिक अल्बम घेऊन येणार असल्याचं त्यांनीच सांगितलं होतं. ’शिवतांडव स्त्रोत्रम’ नावाने आज ते प्रसिध्द झाले असून अल्पावधीतच सोशल मीडियात याला पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे.