अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे अमरावतीमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला तरूणीच्या जबाबामुळे कलाटणी मिळाली असतांना मेळघाटमधील एका तरूणीचा मुस्लीम तरूणाने खून केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षे तरुणीचा मुस्लीम तरूणाने खून केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. या तरूणीला २० जुलै रोजी परतवाडा येथील शाहरुख उर्फ जकीर याने पळवून पुण्याला नेले. गावात पंचायत बसल्यानंतर सदर मुलीला पुण्यात राहत असलेल्या आदिवासी युवकांच्या मदतीने १७ ऑगस्ट रोजी युवतीला गावात परत आणण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी जाकीर उर्फ शाहरुख त्याच्या मित्राला घेऊन गावात आला व मुलीला आपल्या दुचाकी वर घेऊन गेला. यानंतर, १९ ऑगस्ट रोजी रात्री गावातील विहिरीत या मुलीचा मृतदेह गावकर्यांना आढळला.
दरम्यान, परतवाडा येथील शाहरुख उर्फ जाकीर या तरुणाने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने माझ्या मुलीची हत्या केली अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे.