Home Cities पारोळा पी.एच.डी प्राप्त संजय महाराजांचा अमोल पाटलांकडून सत्कार

पी.एच.डी प्राप्त संजय महाराजांचा अमोल पाटलांकडून सत्कार


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मकर संक्रांतीपट कर्ते संजय लक्ष्मण पाठक यांना डॉक्टरेट इन लिटरेचर २४ जुलै रोजी पं दिनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन (मथुरा) द्वारा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर पदवीदान समारंभ कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत विद्यापीठाच्या प्रबंध कार्यकारणीद्वारा महाराष्ट्रातून विभिन्न क्षेत्रातील विशेष कार्य असणाऱ्या ७ विद्वानांची निवड करण्यात आली. त्यात संजय लक्ष्मण पाठक यांची निवड करताना त्यांनी केलेली लक्षित – दुर्लक्षित कार्याचा विचार केला गेला.

औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, योग्यता, अनुभव, प्रतिवर्षी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वितरित होणारे त्यांचे द्वारा लिखित मकरसंक्रांतीपट, अनेक मंदिरे उभारणीसाठी शास्त्रीय मार्गदर्शन, विविध ठिकाणी मूर्तींची चल व अचल प्राणप्रतिष्ठा विधी, केलेले यज्ञयाग, श्रीमद् भागवत व इतर पुराणे, संस्कृत पारायणासह कथा, कुळधर्म कुलाचार मार्गदर्शन, पारंपारीक पूजा अर्चन विधी ,तसेच महाविद्यालयात अध्यापन, वृक्षारोपण व संगोपन, समाजात आदर्श निर्माण होणे व टिकून राहणे यासाठी विविध महानुभावांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, देशभक्ती, विश्वकल्याणासाठी वैयक्तिक अनुष्ठान व इतर अनेक सामाजिक कार्ये ई. केलेली व करत असलेली विशेष कार्याची दखल घेवून विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी सोबत शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, मा.शहरप्रमुख आण्णा चौधरी, संजय चौधरी, पी.आर वाणी, कैलास पाटील, मा.नगरसेवक राजु कासार, पंकज मराठे, भावडु चौधरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound