यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या सातोद-चितोडा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या चितोडा-सातोद रस्त्याच्या नूतनीकरणाची प्रतीक्षा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि युवा नेते अमोल हरिभाऊ जावळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशमहाजन यांच्या माध्यमातून व तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने जवळपास ५ कोटी रुपयाचा भरघोस निधी मंजूर करत पूर्ण केला आहे.
या रस्ता कामाची पाहणी करण्यात साठी आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली व चितोडा-सातोद रस्त्यावर वेगाने सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीकामांसाठी वावरण्याचा रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले व राज्य शासनाचे आणी अमोल जावळे यांचे विशेष आभार मानले. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश भंगाळे, शेतकरी अतुल पाटील , मनोज पाटील , विजय पाटील , गोकुळ पाटील ,वसंत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते .