यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपले वडील दिवंगत माजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेचे आशिर्वाद घेतले.
त्यानंतर त्यांनी यावल तालुक्यातील भालोद येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत स्वंयकुटुंबियानीही मतदानाचा हक्क बजावला.