मार्केटिंग लिमिटेडच्या संचालकपदी अमोल भिरूड बिनविरोध

0
100


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथील मूळ रहिवासी आणि सध्या यावल येथे वास्तव्यास असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यकांत भिरूड यांची मार्केटिंग लिमिटेड या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

यावल तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन आणि डोंगरकठोरा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन असलेले भिरूड यांनी या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवला. मार्केटिंग लिमिटेडच्या संचालकपदासाठी झालेल्या या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले.

अमोल भिरूड यांच्या या यशाचे जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, संचालक विनोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, जळगाव बाजार समितीचे संचालक मनोज बापू चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, धनंजय चौधरी, कदीर खान, विवेक सोनार, सुशील फेगडे, अनिल जंजाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे यावल तालुक्यातील सहकारी चळवळीला नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.