मुंबई (वृत्तसेवा) लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या युतीवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण भाजप अध्यक्ष अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे वृत्त असून आज युतीची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.
अमित शहा आज संध्याकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अमित शाह हे अहमदाबाद येथून मुंबईला येणार आहेत, त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि भाजपामध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परीषद होणार आहे.