अमेरिका २९७ ऐतिहासिक वस्तू भारताला देणार

न्यूयार्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने २९७ प्राचीन वस्तू भारताकडे सोपविल्या आहेत. तस्करीच्या माध्यमातून या वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या होत्या. भारत-अमेरिका यांच्यात सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने जुलै २०२४ मध्ये सांस्कृतिक संपत्तीविषयक सहकार्य करार झाला होता. त्यानुसार या वस्तू भारताला देण्यात आल्या आहेत. याबद्दल मोदी यांनी बायडेन यांचे आभार मानले.

भारताकडे सोपविण्यात आलेल्या या वस्तू इ.स.पूर्व २००० ते इ.स. १९०० या काळातील आहेत. या वस्तूंत ११-१२ व्या शतकातील अप्सरेची मूर्ती, मध्य भारतात सापडलेली जैन तीर्थंकरांची १५-१६ व्या शतकातील कांस्य मूर्ती, ३-४ थ्या शतकातील सिरॅमिक फुलदाणी, भगवान गौतम बुद्धांची १५-१६ व्या शतकातील उभी मूर्ती, इसवी सनपूर्व २०००-१८०० या काळातील कांस्याची मानवरूपी रचना यांच्यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे.

Protected Content