महापालिकेत आमदार निधीतून रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । आमदार निधीचा उपयोग हा जनतेच्या कल्याणासाठी व्हावा , हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो, त्यामुळे जळगाव महापालिकेमध्ये रुग्णवाहिन्यांची संख्या कमी असल्याने, आमदार निधीतून महापालिकेसाठी दोन रुग्णवाहिका देण्याचे ठरवले. त्यातील एका रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले असून येत्या आठ दिवसांमध्ये दुसरी रुग्णवाहिका देखील जनतेच्या सेवेस उपलब्ध होईल असा विश्वास आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला. ते आमदार निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी महापौर जयश्रताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील , मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी , मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष ठुसे, जेष्ठ नगरसेवक सुनील महाजन, नगरसेवक विशाल त्रिपाठी ,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलाने आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आमदार भोळे यांनी यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या कठीण काळात पुन्हा एक कोटी रुपयांचा कोवीड निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच ही वेळ राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची वेळ असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले. कोरोनाला हरवण्याकरिता सर्वांनी सहकार्याच्या भावनेने एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कोरोना टेस्ट आणि लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला यावेळी केले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/5421296757940970

Protected Content