जळगाव प्रतिनिधी । महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 11 ते 14 एप्रिल दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उदया गुरुवारी परिसंवाद होणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये नागपूर येथील ईश्वर नंदापूरे आणि औरंगाबाद येथील प्रा.ऋषिकेश कांबळे यांच्या उपस्थितीत पुरोगामी विचारप्रवाहातील प्रदुषणे : गती आणि अधोगती या विषयावर परिसंवाद होणार आहे.
शुक्रवार, 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर होईल व 13 एप्रिल रोजी महात्मा फुले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत कुणाल बोदडे यांचा गीतगायन कार्यक्रम होणार आहे. 14 रोजी सकाळी 7 वाजता विद्यापीठाचे प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या दरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांनतर सकाळी 10 वाजता अधिसभागृहात उत्तम कांबळे यांचे `फुले-आंबेडकर दृष्टिकोनातील भारत आणि आजचे वास्तव` या विषयावर व्याख्यान होणार असल्याचे जयंती महोत्सव समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.