विधानपरिषदेत शिवीगाळ केल्यामुळे अंबादास दानवें पाच दिवसांसाठी निलंबित

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ करत राज्य शासन आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू धर्मातील नागरिकांविषयी काढलेल्या अपशब्दाचा मुद्दा विधान परिषदेमध्येही गाजला होता. या सभागृहात निषेध ठराव घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या विषयी बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. तसेच दानवे यांनी राजीनामा देऊन सर्वांची माफी मागावी, अशी मागणी देखील लाड यांनी केली होती. आज सभागृहाच्या पायऱ्यांवरही लाड यांनी आंदोलन केले होते.

Protected Content