अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रचंड मेहनत, अभ्यासात सातत्य, उत्तम मार्गदर्शन यामुळे आपण कितीही मोठे असे यश संपादन करू शकतो याचे उदाहरण म्हणजे अमळनेर येथील डॉ तुषार राजेन्द्र शेलकर. डॉ. तुषार शेलकर यांनी नुकतीच एमबीबीएस डीडीव्ही स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेज येथून यश संपादन केले. डॉ तुषार शेलकर हे सध्या सायन हॉस्पिटल मुंबई येथे डर्मटोलॉजिस्ट म्हणून सेवा देत आहेत.



डॉ तुषार हे अमळनेर येथील माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू असून नगरपालिकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेन्द्र शेलकर व सौ लता राजेंद्र शेलकर यांचे मोठे चिरंजीव आहेत. डॉ तुषार यांचा घरात वैद्यकीय शिक्षणाच्या वारसा असून त्यांचे लहान बंधू डॉ विशाल राजेंद्र शेलकर हैदराबाद येथे एम ऑर्थो करीत आहेत. तसेच त्यांचे आतेबंधू डॉ. उपलेश महाजन (स्त्रीरोग तज्ञ), डॉ पंकज महाजन (एमडी मेडिसिन), डॉ. मयूर महाजन (डीएनबी भूल रोग तज्ञ) म्हणून अमळनेर येथे आपल्या गणपती हॉस्पिटल व क्रिटीकेअर सेंटर च्या माध्यमातून सेवा देत आहेत. डॉ तुषार शेलकर यांच्या या यशाबद्दल माळी समाज व मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. डॉ तुषार शेलकर यांनी मनोगतात सांगितले की, लवकरच अमळनेर शहरातील नागरिकांसाठी डर्मटोलॉजिस्ट व ॲक्सिडेंट रुग्णालय स्थापन करून रुग्णांची सेवा करण्याच्या त्यांचा मानस आहे.


