अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नगरपालिकेने पावसाळ्यात भुयारी गटारीचे कामे करून सोनार नगरात रस्त्यावर चिखल तयार झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरीकांचे हाल होत आहेत.
गेल्या वर्षभरात भुयारी गटारीचे काम न करता ऐन पावसाळ्यात हे कामे केले गेल्याने डांबरीकरणाची जागा चिखल मातीने घेतल्याने शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांचे हाल झाले असून या चिखलात बरेच शाळकरी मुलांना सायकली काढता न आल्याने त्यात पडल्याने गेल्या दोन दिवसात एकाचा हात तर जेष्ठ नागरिकाचा पायही मोडल्याने अजून किती जणांचे कंबरडे मोडण्याची वाट नगरपालिका प्रशासन पाहतेय, अशी टीका होत आहे. नगरपालिका प्रशासन सर्वसामान्याच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
मात्र सदस्यस्थितीत गरज नसताना भुयारी गटारीचे काम करून ऐन निवडणूकीच्या तोंडावर काय सिद्ध करण्याच्या प्रयत्न नगरपालिका प्रशासनाने केला आहे. असाही प्रश्न उपास्थित होत असून हे काम निवडणूकीच्या अगोदर करून लाखो रुपयांचा आलेला निधी वापरून नागरिकांची सोय न करता गैरसोय करीत असल्याने याठीकाणी पावसाळ्यात तात्पुरता स्वरूपात मुरूम टाकून होत असलेली गैरसोय दूर करावी.