Home Cities अमळनेर महिला हिंसाचाराविरोधात अमळनेरात आंदोलन

महिला हिंसाचाराविरोधात अमळनेरात आंदोलन

0
34

अमळनेर प्रतिनिधी । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील हिंसाचार वाढत आहे. या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले असून यासंदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

दरम्यान, यात दोषीवर लवकरात लवकर कारवाही करावी व पुढे या प्रकारच्या घटना घडून नये, यासाठी कायदा करावा अशीच मागणी या निवेदनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. यावेळी केशव पाटील, अभय काळे, रोहित पाटील, गणेश मिस्त्री, प्रितेश पाटील, पवन सातपुते, भूषण पाटील, कुणाल पाटील, देवयानी भावसार व प्रगती काळे गौरव नांद्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound