अमळनेर प्रतिनिधी । महिलांचा योग्य सन्मानाची गरज असल्याचे प्रतिपादन साने गुरूजी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. माधुरी भांडारकर यांनी केले. ते वाचनालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व प्रा. डॉ.माधुरी भांडारकर तर प्रमुख अतिथी ज्योतिर्मयी बाविस्कर चिटणीस प्रकाश वाघ, विश्वस्त बापू नागावकर ग्रंथालयाच्या कर्मचारी धारकर मॅडम होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले ,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. डॉ माधुरी भांडारकर उपक्रमशील शिक्षिका ज्योतिर्मयी बाविस्कर वाचनालयाच्या कर्मचारी धाडकर मॅडम यांचा यथोचित सन्मान शाल व बुके देऊन व्यासपीठावरील मान्यवरांनी केला. सत्काराला उत्तर देताना ज्योतिर्मयी बाविस्कर म्हणाल्या की कोणती फळाची अपेक्षा न करता कार्य करीत रहा सन्मान होतोच आज महिला दिनानिमित्ताने माझा गीत सूचित सन्मान केल्याबद्दल वाटण्याच्या विश्वस्त मंडळाचे मनस्वी आभार मानते. अध्यक्षीय भाषणात वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे म्हणाले की महिलांना संरक्षणाची गरज आहे निर्णयक्षम महिलाही उज्वल समाजाची नांदी ठरू शकते बर्याच महिला चौकटीतले आयुष्य जगतात घराचा उंबरठा त्यांना ओलांडता येत नाही अशा महिलांना स्वतंत्र मिळाले तरच खर्या अर्थाने महिला दिन साजरा झाल्यासारखा होईल. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक अॅडवोकेट रामकृष्ण उपासनी यांनी केले. कार्यक्रमास भीमराव जाधव ,पी एन भादलीकर सुमित कुलकर्णी ,प्रसाद जोशी, दीपक वाल्हे, उपस्थित होते.