Home Cities अमळनेर पेट्रोल पंपावर लुट करणारे दोघे अटकेत

पेट्रोल पंपावर लुट करणारे दोघे अटकेत

0
35

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पेट्रोल पंपावर गावठी पिस्तुलचा धाक दाखवून लुट करणार्‍या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणार्‍या पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरूवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हातात गावठी पिस्तुलचा धाक दाखवून सुमारे ३६ हजार ५०० रुपये लुटून नेले होते. तसेच पेट्रोल पंपावर एक कार चालक पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याला देखील बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे देखील काढून घेतले. हा प्रकार पेट्रोलपंचाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता.

दरम्यान, पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. यात चौकशीची सूत्रे फिरवून दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

या दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विकास शिरोडे, अनिल भुसारे, हवालदार किशोर पाटील, दीपक माळी, शरद पाटील, रवींद्र पाटील, योगेश महाजन, सिध्दांत शिसोदे यांच्या पथकाने सहकार्य केले.


Protected Content

Play sound