अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर एसटी डेपोमधील काही कामचुकार कर्मचारी यांचे अहवाल मागवून कारवाई केल्याचे मागविल्याच्या कारणावरून एसटी डेपो मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार बुधवार २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी गुरुवारी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर बसस्थानकात एस.टी. डेपो मॅनेजर म्हणून इमरान खान तसलीम खान पठाण वय-३५ रा. अमळनेर हे काम पाहत आहे. त्यांनी राज्य परिवहन मंडळामधील कामचुकार कर्मचारी यांचे अहवाल मागितले व त्यांच्यावर कारवाई केली. याचा राग आल्याने किरण नामदेव धनगर याने बुधवारी २७ मार्च रोजी रात्री आठ वाजता डेपो मॅनेजर इम्रान पठाण यांना फोनवरून एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप करत शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी गुरुवार २८ मार्च रोजी सकाळी ११ वाता डेपो मॅनेजर इम्रान पठाण यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार किरण नामदेव धनगर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.