अमळनेर प्रतिनिधी । दैनंदिन जीवनामध्ये आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आणि संसाराचा गाडा हाकण्याकरिता माणसाला नोकरी-व्यवसाय करावा लागतो. मात्र ५८ व्या वर्षी तो आपल्या नोकरीतून सेवानिवृत्त होतअसला तरी सार्वजनिक जीवनातून आणि सामाजिक बांधिलकीतून तो कधीही निवृत्त होत नसतो. उलट पुढच्या पिढीला अनुभवांचे अमृत देण्याची मार्गदर्शन करण्याची नैतिक जबाबदारी त्याच्यावर पडलेली असते. पूजा पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत हक्कापेक्षा कर्तव्याला महत्त्व दिले. आज एवढा मोठा सत्कार सोहळयाचा श्रीमती पुजा पाटील यांचा कार्यक्रम होत आहे. ही त्यांची कामाची पावती आहे.उलट आता खऱ्या अर्थाने त्यांच्या कुंढब, नातेवाईक, समाजाप्रती जबाबदारी वाढणार आहे, असे अमळनेर येथील गुरुकृपा काँलनीतील सेवानिवृत्त कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी बी.बी.वारूडकर बोलत होते.
श्रीमती पूजा दगडू पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा, अंमळनेर येथे गुरुकृपा कॉलनी, त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला. व्यासपीठावर वारूळकर (बालविकास प्रकल्प अधिकारी, पारोळा) श्रीमती ए.बी. भागवत मॅडम पर्यवेक्षिका, अमळनेर जिजाबाई बाबुराव पाटील (तरसोद), रामराव पाटील व कोकिळा रामराव पाटील, चोरगाव, सेवानिवृत्त सेक्रेटरी दगडू पाटील, मेहेरगाव होते. अगोदर त्यांच्या कार्यालयातील अंगणवाडी का सेविका पर्यवेक्षिका यांनी पूजा पाटील व दगडू पाटील यांचा साडी ड्रेस व भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती भागवत यांनी सेवानिवृत्त पूजा पाटील यांच्या सेवेतील कार्याचा उजाळा केला व त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला तर ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी पूजा पाटील अंगणवाडी काम करीत असताना बालकांच्या मनावर चांगल्या प्रकारे संस्कार केल्यामुळे व सेवा दिल्यामुळे आज त्यांची दोन्ही मुलं व मुली, जावाई विद्या विभूषित व चांगल्या क्षेत्रात नोकरीला आहेत हेच त्यांच्या कार्याचे फळ आहे, असे सांगितले.
पूजा पाटील यांच्याबद्दल त्यांच्या मुली नातू यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आई व आजींच्या आठवणींना उजाळा दिल्याने क्षणभर गहिवरून आले. अमळनेर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रीमती पूजा पाटील दगडू पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीग्राम पाटील व सी.आर.पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजकिरण पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला महिला व पुरुष यांची मोठी गर्दी होती.