अमळनेर येथे संत सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळा उत्साहात (व्हिडीओ)

amalner11

अमळनेर (ईश्वर महाजन)। सदगुरु संत श्री सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी सोहळा उत्सव अमळनेरला २१ ते २९ एप्रिल २०१९ पासून सुरू असल्याने या कार्यक्रमाला आतापर्यंत भारतातील अनेक राज्यातील संताची उपस्थिती लागत आहे. अमळनेरला या संत सखाराम महाराज द्विशताब्दी कार्यक्रमात एक कुंभ मेळाव्याचे स्वरूप निर्माण झाले आहे.

श्री सद्गुरु श्री सखाराम महाराज परंपरेचा वैराग्य भक्ती ज्ञान व परंपरा निर्वाणाचा आग्रह सर्वांना प्रसिद्ध आहे. संत सखाराम महाराज यांच्या समाधी पुण्यस्मरणाच्या शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्री तुकाराम महाराजांच्या गाथा चे सामुदायिक पारायण अखंड भगवान मुसिक कीर्तन महोत्सव 108 कुंडाची भव्य श्री महाविष्णू पंचायतनयाग व विविध सामाजिक उपक्रम नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण व संवर्धन दिव्यांगांना साहित्य वाटप या कार्यक्रमात करण्यात आले.

दररोज दहा ते पंधरा हजार अमळनेर तालुक्यातील व परिसरातील व भाविक राज्यातून आलेले यांना जेवणाची दररोज व्यवस्था केली आहे यासाठी अनेक यांचे सहकार्य लाभत आहे मागे अवकाळी पावसामुळे मंडपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते परंतु अमळनेर शहरातील अनेक तरुण वर्गाने मदतीचा हात दिला युद्धपातळीवर 48 तासात मंडप उभारला. मंडप जेव्हा पडला तेव्हा कुणाचेही नुकसान किंवा कोणालाही जखम झाली नाही अनेक भाविक लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असल्याचे समजते श्री संत सखाराम महाराज संस्थांनचे गादीपती पूज्य प्रसाद महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, यादी शताब्दी सोहळ्यात प्रवचन किर्तन भव्य नेत्रतपासणी शिबिर गरजू रूग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना विनामूल्य साहित्य वाटप दिव्यांगांसाठी नित्य उपयोगी साहित्य वाटप नोंदणी केलेल्या दिव्यांगांना कमोड खुर्ची काठी काठी इत्यादी साहित्याची विनामूल्य वाटप संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले श्री संत सखाराम महाराज संस्थान भक्त निवासात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजता यावेळेत भव्य रक्तदान शिबिर 1008 बाटल्यांचा रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. वृक्षारोपण शिबीर उद्घाटन भव्य क्रीडा स्पर्धा याठिकाणी झाल्या.

संत सखाराम महाराज शताब्दी सोहळ्यात चतुर्वेद, पारायण, ऋग्वेद, सामवेद, अर्थवेद, कृष्ण यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद या विषयांवर महाराष्ट्रातील मान्यवर यांचे प्रवचन होत आहे. त्यासाठी भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते संत सखाराम महाराज दि शताब्दी सोहळ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लहानापासून ते वृद्धांपर्यंत या ठिकाणी सेवा देत आहेत अत्यंत शिस्तबद्ध हा कार्यक्रम होत आहे. अनेकजन आपल्या परीने यथाशक्तीप्रमाणे आर्थिक मदत करीत आहेत. एका आठ वर्षाच्या मुलीने आपल्या दोनशे अकरा रुपये गल्यातील खाऊचे पैसे जमा केलेलेसंत प्रसाद महाराज यांच्या स्वाधीन करून स्वतःची एक छोटी मदत दिली. महाराजांनी त्या मुलीचे कौतुक केले. धुळे येथील सुभाष देवरे यांच्याकडून दररोज दहा हजार लोकांना पुरेल एवढा भाजीपाला विनामूल्य मिळत आहे 27 एप्रिल दीपोत्सव कार्यक्रमात संध्याकाळी साडेसात वाजता संध्याकाळी पंधरा मिनिटे लाईट विजवून सर्व भाविकांच्या हातात पणती लावून दीपोत्सव कार्यक्रम केला जाणार आहे यातून अमळनेर शहरातील नागरिकांना एक आव्हान केले जाणार आहे आपणही स्व इच्छने कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. ज्यांना शक्य होईल त्यांनी संत सखाराम महाराज दि शताब्दी सोहळ्यात सहभाग नोंदवावा व ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी पंधरा मिनिटे वीज बंद करून एक पणती लावून ज्ञानेश्वरांच्या ओवीचे घरबसल्या वाचन करावे जेणेकरून यातून विज बचतीचा संदेश नागरिकांना मिळणार आहे.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमासाठी अमळनेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, डीवायएसपी राजेंद्र ससाने, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, नगरपालिकाचे कर्मचारी, वीज मंडळाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी शहरातील सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभत आहे. पत्रकार परिषदेत दिलीप देशमुख राजेंद्र देशमुख जयवंतराव मोडक राजेंद्र भामरे पवन शेटे उदय देशपांडे बाबा देशमुख उपस्थित होते.

 

 

Add Comment

Protected Content