अमळनेर प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पायविहीरी अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा जवळ व बोरी नदीत होत्या. आजही अहिल्याबाई होळकरांच्या स्मृति जतन करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. अमळनेर येथील धनगर समाजाच्या वतीने अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार साहेबराव पाटील बोलत होते.
त्या विहीरीतील गाळ काढून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्याने त्या विहीरीतील पाणी आजही दुष्काळी परीस्थिती असतांना पाण्याची तिव्रटंचाई असतांना धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर होत आहे. यात्रा काळात त्या विहिरीचा पाण्याचा उपयोग होत आहे. नगरपालीकेच्या माध्यमातून बसस्थानकजवळ अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसविल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली असल्याचे देखील साहेबराव पाटील यांनी सांगितले.
व्यासपीठावर दलित समाजाचे नेते रामभाऊ संदाशिव, नगरसेवक संजय पाटील, मनोज पाटील, विक्रांत पाटील, नितीन निळे ,दशरथ लांडगे, मच्छिंद्र लांडगे, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, समाधान धनगर, अँड. शशिकांत पाटील, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष बंडू पाटील, महेश पाटील, उदय चौधरी, पी.एस.आय दिलीप शेबळे, गं.का. सोनवणे,ईश्वर महाजन, उपस्थित होते.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. धनगर समाजाच्या महिला अध्यक्ष वसुंधरा लांडगे यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून अहिल्याबाईंचा एक भव्यदिव्य पुतळा अमळनेर शहराच्या मध्यवर्ती भागात झाल्याचे मोठे समाधान आहे .धनगर समाज त्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहील असे सांगत त्या पुढे म्हणाल्या कि माजी आमदार पाटील यांनी अमळनेर शहरात सर्व बहुजन समाजाचे पुतळे बसवल्यामुळे अंमळनेर शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे असे सांगितले. अमळनेर शहरात धनगर समाजाच्या वतीने अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरंजन पेंढारे ,शंकर न्हाळदे, धनराज कंखरे ,भिकन न्हाळदे, प्रदीप कंखरे ,पंडित लांडगे , श्रावण तेले, बी एम सांगोरे,आर.पी ,धनगर ,प्राध्यापक आर जी सोनवणे, विठोबा साबे व धनगर समाज व इतर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन निरंजन पेंढारे यांनी मानले.