अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांना नुकताच डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम क्रांती ज्योत प्रतिष्ठान,नंदुरबार व रायबा बहुउद्देशीय संस्था,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने सचिन खंडारे यांना यंदाचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते धुळे येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
सचिन खंडारे यांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड आहे तसेच त्यांनी कोविड काळात अनेक गरजू रुग्णांना मदत केली.यावेळी बिपीन पाटील, गोरख देवरे, राकेश पाटील,प्रफुल्ल पाटील,प्रमोद पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.