अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी शहरातील रस्त्यांसाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे अमळनेर शहरातील रस्ते कात टाकणार आहेत. याच निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंग पथदिवे,योगा हॉल आणि भूखंड सुशोभीकरण आदी कामे होणार आहेत.
या कामांची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यातील बहुतांश रस्ते हे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ९ म्हणजे मुख्य बाजारपेठ परिसरातील असल्याने या नव्या रस्त्यांमुळे व्यावसायिक व नागरिकांची समस्या सुटणार आहे. या कामांतर्गत काही रस्ते ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरणासह होणार आहेत.याबाबतचा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने दि २३ ऑगस्ट रोजी उपसचिव प्रशांत आंडगे यांच्या सहीने अमळनेर नगरपरिषदेसाठी प्रसिद्ध झाला असून अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून ही सर्व विकास कामे होणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
भुयारी गटारीच्या कामापासून शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने या रस्त्यांना नागरिक अक्षरशः वैतागले होते,पावसाळ्यात तर नागरिकांचे प्रचंड हाल होत होते,बाजारपेठ परिसरातील रस्त्यांची अशी वाईट अवस्था असल्याने शहराच्या सौंदर्यात देखील कुठेतरी बाधा निर्माण झाली होती,यामुळे प्रभाग ९ मधील न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या सर्व पदाधिकार्यांनी देखील नामदार अनिल पाटील यांची भेट घेऊन या रस्त्यांचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी केली होती.याशिवाय इतर प्रभागातील नागरिकांनी देखील रस्त्यांची मागणी केली होती.
मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व ना अजित पवार, नगरविकास मंत्री यांच्या सहकार्याने वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.लवकरच या रस्त्यांची टेंडर प्रोसेस व वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
हे होणार दहा रस्ते
ना. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या १० कोटी निधीपैकी प्रत्यक्ष ७ कोटी ३० लक्ष निधीतून दहा रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे.यात-
पिंपळे रस्ता ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे(२ कोटी )प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाचपावली चौक ते वीर समशेरसिंग पारधी चौक ट्रीमिक्स रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (८० लक्ष),पिंपळे रस्ता ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे(२ कोटी ),बसस्टँड ते स्टेट बँक चौक पर्यंत रस्ता मजबुतीकरणं व डांबरीकरण करणे (८० लक्ष ),दुर्गा टी ते डॉ अंजली चव्हाण यांच्या दवाखान्यापर्यंत पर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे(७० लक्ष),मंगलमूर्ती पतपेढी ते बीएसएनएल कार्यालया पर्यंत रस्ता मजबुतीकरणं व डांबरीकरण करणे(५० लक्ष),लालबाग टाकी ते बोहरी पेट्रोल पंप पर्यंत ट्रीमिक्स रस्ता कॉंक्रीटीकरण करणे(६० लक्ष) प्रभाग २ मध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरणं करणे (५० लक्ष),आर के नगर भागात रस्ता ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे(४० लक्ष),सिंधी कॉलनी भागात रस्ता ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे (४० लक्ष),साळीवाडा परिसरात रस्ता ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे (४० लक्ष) आदी दहा रस्त्यांची कामे होणार आहेत.
पावणेतीन कोटी निधीतून होणार ही कामे,,,
उर्वरित २ कोटी ७० लक्ष निधीपैकी दीड कोटी निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंगचे पथदिवे लागणार असल्याने अनेक प्रभाग चकाकणार आहेत,याशिवाय गट न १६८/११ व गट नंबर १४४/अ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४० लक्ष निधीतून योगा हॉलचे बांधकाम व ४० लक्ष निधीतून गट नंबर १४३३ येथे खुला भूखंड विकसित केला जाणार आहे.
सदर महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न मंत्री अनिल पाटील यांनी मार्गी लावल्याने न्यू प्लॉट परिसर विकास मंच,बाजारपेठेतील व्यापारी बांधव,लहानमोठे व्यावसायिक इतर प्रभागातील नागरिक यांनी मंत्री अनिल पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तर अनिल यांनी सदर मंजुरी बद्दल मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,ग्रामविकास ना गिरीश महाजन यांचे जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.