मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा कर्मचार्‍यांअभावी रूग्णांचे हाल

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा कर्मचार्‍यांच्या अभावी रूग्णांचे हाल होत असून याची दखल घेत कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

याबाबत वृत्त असे की, सदयस्थितित सर्वत्र साथीच्या आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसुन येत आहेत. तालुक्यातील मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ३० ते ३२ गावे जोडली गेलीआहेत. परिणामी आरोग्य केंद्रात रुग्ण येण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.आरोग्य केंद्राला कर्मचारी संख्या ३५ मंजूर असून केवळ नऊ पूर्णवेळ तर कंत्राटी कर्मचारी केवळ पाच कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. दवाखान्यात दोन वैद्यकीय अधिकारी असताना देखील वैद्यकीय अधिकारी वेळेवर कामाला येत नसल्याची ओरड रुग्णाकडून केले जाते आहे.

दरम्यान, दिनांक २४ रोजी मुडी येथील एक रूग्ण महिला सकाळी आठ वाजल्यापासून दवाखान्यात आली होती.त्यांना थंडी ताप व अशक्तपणा जाणवत होता.त्यांना अक्षरशः बसता येत नव्हते.वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने त्यांना तपासायला कोणीच नव्हते.ही वार्ता गावात समजल्यावर गावातील विजय पाटील,रमा पाटील,हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पवार यांनी बिस्कीट वैगरे खाऊ घातले. वैद्यकीय अधिकारी यांचा ओ पी डी चा वेळ सकाळी ८ ते १२ असताना रुग्णांना दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत डॉक्टरची वाट पहात बसावे लागते.दुपारी २ वाजेपासून प्राथमिक आरोग्य केंद्र वार्‍यावर राहत असल्याची चर्चा आहे. याबाबत डॉक्टर सागर पाटील यांच्याशी संपर्क केला असता कर्मचारी संख्या कमी आहे असे कारण त्यांनी दिली.

मांडळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील म्हणाले की, मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचारी संख्या कमी असल्याने समस्या निर्माण होत असून कोविड लसिकरण सुरु असल्याने पुन्हा त्यात कर्मचारी यांची विभागणी होत असल्याने काही वेळेस अडचणी येत असून रिक्त कर्मचारी उपलब्ध व्हावेत याबाबत वरिष्ठ यांना कळविण्यात आले आहे.

Protected Content