अमळनेर प्रतिनिधी । येथील पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी तालुक्यातील पातोंडा येथील एका महिलेला रक्तदान देवून जीवदान देवून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, अमळनेर येथील रक्तदानाची चळवळ उभी करणारे मनोज शिंगाने व त्यांच्या गृपकडून सोशल मिड्यावर नेहमीच रक्तदान करण्यासाठी मदत मागितली जाते. त्या निमित्ताने गरजू लोकांना रक्तदान केले जात असते. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील मनिषा पाटील या महिलेस ‘बी पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः रक्तदान करत समाजात एक नविन आदर्श निर्माण केला आहे. प्रशासकीय अधिकारी या नात्याने समाजात कसे वागले पाहिजे हे त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे.
“शिकायचं एक आणि वागायचं वेगळ” हे नोकरीतले ब्रीदवाक्य आहे पण ते विधान खोटे ठरवत “जे शिकायचं तेच वागायचं” हे रक्तदानाच्या माध्यमातून पीआय अंबादास मोरे यांनी समाजातील प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.