Home Cities अमळनेर पहिलवानाला आत्महत्येस प्रवृत्त केले; गुन्हा दाखल

पहिलवानाला आत्महत्येस प्रवृत्त केले; गुन्हा दाखल

0
40
FIR

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील सारबेटे येथील पहिलवानाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील सारबेटे येथे १२ जानेवारीला नामवंत पहिलवान असणारे पांडुरंग शिवराम पाटील (वय ५५) यांचे तेजस विजय पाटील याच्यासोबत भांडण झाले. त्यात तेजसने पांडुरंग पाटील यांना बेदम मारहाण केली. ही बाब अपमानास्पद वाटल्याने त्यांनी सायंकाळी ६ वाजता विष प्राशन केले. यानंतर त्यांना धुळे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. १३ रोजी सकाळी त्यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले.

दरम्यान, आपल्या वडिलांच्या आत्महत्येस तेजस जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे पुत्र योगेश पाटील याने केला. त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल व्हावा म्हणून पांडुरंग पाटील यांचा मृतदेह अमळनेर पोलिस ठाण्याबाहेर आणला. यानंतर तेजस पाटील विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound