Home Cities अमळनेर जुगार्‍यांसह बुकी पोलिसांच्या ताब्यात

जुगार्‍यांसह बुकी पोलिसांच्या ताब्यात

0
39

अमळनेर प्रतिनिधी । स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेसह अमळनेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जुगार्‍यांसह बुकींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अमळनेर शहरात जुगार चालत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. या अनुषंगाने एलसीबीसह अमळनेर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. या पथकात एलसीबीचे हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, सुनील दामोदरे, प्रमोद वंजारी, भारत पाटील तसेच अमळनेर पोलीस स्थानकाचे दीपक माळी, डॉ. शरद पाटील व रवींद्र पाटील यांचा समावेश होता.

पोलिसांच्या या पथकाला बाहेरपुरा भागात कमीलखा लहूखा पठाण हा जुगार चालवताना आढळून आला. त्याच्याजवळून ४ हजार ५५० रुपये व सट्टा, जुगाराची साधने जप्त करण्यात आली. यासोबत जुगार अड्डयाचा मालक रहिम छोटू बागवान याच्यासह गुलाब नथ्थू पाटील, प्रल्हाद संतोष पाटील उर्फ न्हानभाऊ (रा. पैलाड) यांना ताब्यात घेण्यात आले.

यासोबत पोलिसांनी चिंत्या चौकात छापा टाकून किशोर गुलाबराव पाटील याला जुगार खेळताना अटक केली. त्याच्या जवळून १ हजार १६० रुपये आणि जुगाराचे साधने जप्त केली. या पाचही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Protected Content

Play sound