अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीस भरतीत एनसीसी प्रमाणपत्र धारकांना मिळत असलेल्या काही टक्के वाढीव गुणांमुळे सामान्यवर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो. त्यांचे वाढीव गुण रद्द करा, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, प्रातांधिकारी सीमा अहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनातर्फे एनसीसी प्रमाणपत्र धारकाना पोलीस भरतीत २,३, आणि ५ टक्के वाढीव गुण मिळत असतात. यामुळे सर्वसामान्य उमेदवारावर एकप्रकारे हा अन्यायच आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत सामान्य विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत असतो. त्यातच एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार वाढीव मिळणार्या गुणांमुळे पुढे निघत असतो. सामान्य उमेदवाराकडे कुवत असूनही तो अपयशी ठरतो. हा एकप्रकारे अन्यायच आहे. नेते आपापल्या सोईनुसार नियम बदलवत असतात त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करणार्या तरुणांने काय करावे. येणार्या भरती प्रक्रियेपूर्वी सदर नियम बदलवीण्यात यावे. अशी मागणी महराष्ट्र राज्य पोलीस भरती संघटना, अमळनेर तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन देतांना महेंद्र पाटील, सचिन भोई, मनीष पाटील, हर्षल कुंभार, जयेश चव्हाण, प्रदीप चौधरी, योगेश कोळी, गौरव पाटील, रोहन वाल्हे, रोहित पाटील, जयेश पाठक, वैभव सैंदाणे, नयन वारुळे, प्रदीप निकम, राजेंद्र पाटील,ललित पाटील, भरत शिंदे आदींची उपस्थिती होती.