अमळनेर प्रतिनिधी । भाजपाचे माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांनी आमदार स्मिता वाघ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील महिला प्रांतांधिकारी आणि तहसिलदार यांना कारवाईची मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शुभांगी घोडके विसपुते यांनी दिली आहे. सदरील निवेदन भडगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर येथून एकाच वेळी देण्यात येणार असल्याचीही माहिती विसपुते यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, भाजपा माजी आमदार डॉ.बी.एस पाटील यांनी पारोळा येथील भाजपा मेळाव्यात खरे तर खासदार ए.टी. पाटील यांचे सभेत आक्षेपार्ह विधान महिला आमदार स्मिताताई वाघ यांचे बदल बोलत टीका केली. ही टिका समस्त महिलांचा अवमान असून सार्वजनिक जीवनात महिला पुढाकार घेऊ शकणार नाहीत, असे घाणेरडे वक्तव्य करून समस्त महिला वर्गाची बदनामी या माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील याने केली आहे. त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी महिला अन्याय विरोधी कृती समिती कडून पारोळा, भडगाव पाचोरा व अमळनेर येथील तहसील, प्रांताधिकारी व प्रशासनास सोमवार 15 एप्रिल 19 रोजी एकाच वेळी मोर्चा नेऊन निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती शुभांगी घोडके विसपुते यांनीं प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे. त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन देखील केले आहे. महिलेचा अवमान कुणीही करू नये, अन्यथा धडा शिकवू असा नारा देत सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे, सार्वजनिक जीवनात पुढाकार घेणाऱ्या महिला, त्यांना पाठबळ देणारे पुरुष यांनी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.