Home Cities अमळनेर अमळनेरला लायन्स क्लबतर्फे ‘डर के आगे जीत है’ कार्यक्रम

अमळनेरला लायन्स क्लबतर्फे ‘डर के आगे जीत है’ कार्यक्रम

0
28

अमळनेर प्रतिनिधी । येथील लायन्स क्लबतर्फे प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी ‘डर के आगे जीत है’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात दर्शनाताई पवार यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. ज्योती राणे होत्या. आपण कश्या प्रकारे यश मिळवू शक़तो, प्रतिकुल परीस्थितीवर कशा प्रकारे मात करु शकतो या बाबत श्रीमती पवार यांनी मार्गदर्शन केले. छेडखानी करणार्‍या मुलांना न घाबरता कश्या प्रकारे त्यांच्याशी सामना करावा हे समजावून सांगीतले. डॉ. मयूरी जोशी यांनी मुलींना वैद्यकीय निगा कशी राखावी याबद्दल माहिती दिली. लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी यांनी डर के आगे जीत है या विषयावर मनोगत मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नलिनी पाटील यांनी केले. यावेळी क्लबचे सचिव डॉ. संदीप जोशी, ट्रेज़रर विनोद अग्रवाल,पंकज मुंदड़ा, अनिल रायसोनी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, डॉ. मंज़िरी कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र जैन, योगेश मुंदडे लायनेस क्लबच्या अध्यक्षा नयना नवसारिकर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound