अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणूकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामीण भाजपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.
बुधवार, दि. १ जून रोजी मंगळग्रह मंदिर, अमळनेर येथे दुपारी ३.३० वाजता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामिण भाजपाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी. जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आ. गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जळगाव मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, मा.आ.डॉ बी.एस पाटील, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष माजी.आ.सौ.स्मिता वाघ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी निवडणूकांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असा हा मेळावा असून भाजपाची पुढील रणनीती यावेळी मांडण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यात जि प व प स सदस्य, मार्केट पदाधिकारी, सर्व सरपंच व ग्रा प सदस्य, वि का सोसायटी पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख तसेच शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, बूथ प्रमुख,सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी तसेच सर्व भाजपा कार्यकर्ते आणि प्रेमींनी उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी केलं आहे.