अमळनेर बसस्थानकात प्रवाश्यांची उन्हात ताटकळत बसची प्रतीक्षा

WhatsApp Image 2019 05 26 at 3.14.13 PM

अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) येथील बसस्थानकावर सोयी सुविधा उत्तम आहेत. परंतु, या बसस्थानकात एकही वृक्ष नसल्याने सावली अभावी प्रवाशांना ताटकळत उन्हात थांबावे लागत आहे. बस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना होणाऱ्या गौरसोयीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शासन शासकीय कार्यलयांसोबतच सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक यांच्या सहभागाने वृक्ष लागवडीसाठी प्रयत्नशील असतांना अमळनेर बसस्थानक त्याला अपवाद ठरत आहे. प्रवाशी बस्थानकांत सावली नसल्याने जेथे सावली मिळेल तेथे थांबून त्यांच्या बसची वाट पाहत असतात.. परंतु, याच वेळी त्यांची बस निघून जात असल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागते. काही प्रमाणात शेड उपरण्यात आले आहेत त्या पुरेशा नसल्याने प्रवाशांना शेड बाहेरच थांबावे लागते. शहरातील सामाजिक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन वृक्षारोपण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण व शहरांमध्ये अनेक वृद्ध, अपंग, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी बस नकावर येत असतात. परंतु सावली अभावी ते उन्हात उभे राहतात. निवारा शेड असले तरी ते पत्र्याचे आहे तेथे उष्णता जाणवत असतो. तरी, अमळनेर आगर प्रमुखांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड करावी. लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करावे अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Add Comment

Protected Content