अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रक्षाबंधन निमित्ताने बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाच्या मोटारसायकलला वाटेतच बसने धडक देऊन गंभीर अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रत्नपिंप्री येथील रहिवासी रोहित मराठे हा रक्षाबंधन निमित्ताने आपल्या बहिणीला घेण्यासाठी तिच्या सासरी नारणे येथे जात होता.नारणे फक्त दहा किलोमीटर असताना सावखेडा फाट्याजवळ असलेल्या देव हॉटेलच्या आसपास सकाळी अंदाजे साडे नऊ ते दहाच्या दरम्यान अमळनेर कडून चोपडाकडे जाणार्या अनुक्रमे निळ्या व लाल रंगाच्या दोन बसेस एकामागून एक भरधाव जात होत्या. मागची गाडी पुढच्या बसला ओव्हरटेक करीत असताना बसचा मागील भागाने रोहितला जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये रोहितची मोटरसायकल पडून त्याचा गंभीर अपघात झाला.त्यात तो पूर्णतः घाबरून गेला.बसेसचा नंबर मात्र त्याला घेता आला नाही. या घटनेची माहिती मिळताच त्याचे पाहुणे व बहिणीची सासू घटनास्थळी जाऊन पातोंडा येथील खाजगी दवाखान्यात आले. रोहित मराठे याच्या पावाला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णवाहिका करून अमळनेर जाण्याचा सल्ला दिला.अकरा वाजता अपघातग्रस्त रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात आले असता दवाखाना बंद होता.डॉक्टर व कोणताच आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हता.कैलास बिरारी यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिका मागवून पुढील उपचारासाठी अमळनेर पाठविण्यात आले.
त्यात रोहितच्या घुडग्याला गंभीर दुखापत झाली असून गुढग्याची वाटी सरकली आहे.त्यामुळे त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.पातोंडा येथे नियुक्त असणारे नियंत्रक रविवारी सुटी असल्याने बसेसची माहिती मिळाली नाही.ते असते तर धडक देणार्या बसची माहिती प्राप्त झाली असती.
दरम्यान, या संदर्भात सागर मोरे म्हणाले की, धडक दिलेल्या बसेसची माहिती घेण्यासाठी मी अमळनेर व चोपडा आगाराच्या लँडलाईन क्रमांकावर संपर्क केला असता सदर नंबर बंद आढळून आलेत.अमळनेर येथील एका अधिकार्याला दूरध्वनीवरून याबाबत विचारणा केली असता सदर बसेसची माहीती त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. यामुळे ओव्हरटेक करणारी बस अज्ञात राहिली.बसचा ओव्हरटेकमुळे रोहितच्या अपघाताची व दवाखान्याच्या खर्चाची जबाबदारी कोण घेईल ?अपघात झालेल्या वेळेनुसार बसेसची माहिती काढून त्याचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.