अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात उद्या (दि.२३)फेब्रुवारीला संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर येथील जीएम सोनार नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांचा 23 फेब्रुवारी रोजी प्रकट दिन असल्याने मंदिराचा प्रवेशद्वाराचे व विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
ता. 23 रोजी सकाळी सात ते नऊ पाद्यपूजन केले जाणार आहे. महिलांची सामूहिक पारायण होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट दिनानिमित्त अमळनेर शहरातील अविनाश सोनार यांच्या माध्यमातून जी .एम सोनार नगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात मंदिराच्या प्रवेश द्वाराचा उदघाटन सोहळा आयोजित केला आहे.
हा सोहळा प्रवेश द्वार बनून देणारे दाते व मंदिराच्या विकासकामासाठी कायम सिहांचा वाटा घेणारे दाते अविनाश गणपतराव सोनार यांच्या हस्ते होणार आहे. याची सगळ्या गजानन परिवाराने नोंद घेऊन कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर .बी. पवार यांनी कळविले आहे.