Home Cities अमळनेर अमळनेरात एकाची गळफास घेवून आत्महत्या

अमळनेरात एकाची गळफास घेवून आत्महत्या

0
36

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील परधीवाडा येथील एकाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र एकनाथ चौधरी पत्नी शीला यांच्यासह शहरातील परधीवाडा येथे वास्तव्याला आहे. मध्यरात्री रवींद्र चौधरी यांनी राहत्या घरात सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. रात्री पत्नी शिला यांना जाग आल्यावर हा प्रकार उघडकीला आला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाही तेच चिंचोरे करीत आहे.


Protected Content

Play sound