सावदा ता. रावेर प्रतिनिधी । कोरोना आटोक्यात आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपरिषद) च्या सभा ऑफलाईन करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र देवून केली आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात कोरोना विषाणूमुळे गेल्या दीड ते दोन वर्षापासून नागरीक हैराण झाले आहे. ठाकरे सरकारने कोरोना महामारीच्या काळात राज्यात काळजीपुर्वक काम केल्याने कारोना आटोक्यात आला आहे. त्यातच आत जळगाव जिल्ह्यात दिवसाला केवळ ४ ते ५ रूग्ण आढळून येत आहे. संचारबंदीचे अनेक निंर्बंध शिथील करण्यात आले आहे. आणि जीवन पुर्वपदावर आले आहे. तरी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थाक नगरपरिषदेच्या ज्या सभा ऑनलाईन होत आहे त्या आता ऑफलाईन करण्यास परवानगी देण्यात यावी ,. कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज येत नाही किंवा कनेक्ट होत नाही. त्यामुळे सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देवून केली आहे.