जळगाव, प्रतिनिधी । खरेदीविक्री दस्तनोंदणी करतांना आरटीपीसीआर चाचणी ऐवजी अँन्टीजेन चाचणी करून दस्त नोंदणीची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मागणीचा आशय असा की, खरेदीविक्री दस्तनोंदणीसाठी किमान ६ लोक घेणार देणार असतात. आरटीपीसीआर चाचणीसाठी प्रत्येकी १ हजार रू खर्च असून रिपोर्ट यायल २ ते ३ दिवस लागतात. आपण मुदत ४८ तास आहे. तरी शासकीय सुट्टी, तांत्रिक अडचणी यामुळे शक्य होत नाही. यात शासनाचे महसूल सुद्धा बुडेल. तरी आरटीपीसीआर न करता अँन्टीजेन टेस्ट करून दस्तनोंदणी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी केली आहे.