जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील धनगर समाजातील सर्व शाखीय विवाह जोडणाऱ्या “मांगल्य” वधु-वर सूचक केंद्र, जळगाव व धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्या संयुक्त विद्यमानाने २८ वा राज्यव्यापी वधु-वर परिचय मेळावा अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस, जळगाव येथे घेण्यात आला. मेळाव्यात २५० पेक्षा अधिक वधूवरांनी आपला परिचय करून दिला. तर १२ विवाह मेळाव्यात जुळून आले. मेळाव्याला राज्यभरातील समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
मेळाव्याचे यंदाचे हे २२ वे वर्ष होते. विचारमंचावर आ. सुरेश भोळे, मल्हार सेनेचे माजी सरसेनापती सुभाष सोनवणे, मांगल्य वधु वर केंद्राचे संचालक प्रभाकर न्हाळदे, संचालिका रेखा न्हाळदे, सेवानिवृत्त डीवायएसपी केशव पातोंड, धनगर महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, जि. प. चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे, शिंगाडीचे उपसरपंच रामचंद्र चऱ्हाटे उपस्थित होते. सुरुवातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांनी माल्यार्पण करून दीपप्रज्वलन केले.
यानंतर प्रस्तावनेतून मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश संचालिका रेखा न्हाळदे यांनी स्पष्ट केला. मान्यवरांच्या हस्ते समाजाच्या वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, मल्हार सेनेचे सरसेनापती सुभाष सोनवणे, राहुल इधे, डीवायएसपी केशव पातोंड, सुरेश धनके यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात त्यांनी सांगितले कि, वधूवरांचे विवाह जुळविणे सोपे जाते, मात्र भविष्यात अनेक समस्या आज निर्माण होताहेत. त्यावर तोडगा निघाला नाही तर संसाराला उध्वस्त व्हायची वेळ येते. यासाठी विवाह जुळविताना विवाहेच्छुक वधू व वर यांनी एकमेकांना जाणून घेतले पाहिजे. स्वभाव, विचारांची माहिती दिली पाहिजे. म्हणजे विवाह झाल्यावर तणाव होत नाहीत, असेही मान्यवरांनी सांगितले.
मेळाव्याला हरिभाऊ हिवराळे, शोभा मोते, नलिनी भदे, संदीप सावळे, भरत यवस्कर, गणेश जाणे, प्रमिला कंखरे, विठ्ठल बोरसे, रमेश सोनवणे, अरुण ठाकरे, नारायण निळे, गजानन निळे, डी. बी. पांढरे, चंद्रकांत ठोके, रवींद्र भालेराव, अतुल सूर्यवंशी, अशोक देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. तर आभार गणेश बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद सोनवणे, धर्मा सोनवणे, संतोष कचरे, तुळशीराम सोनवणे, पिंटू मनोरे, प्रवीण पवार, सुनील खोमणे, दिगंबर सोनवणे, मयूर ठाकरे, उमेश सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.