बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. शरद पवार यांचे कुटुंबिय श्रीनिवास पवार, रणजित पवार यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जावून भेट घेतली आहे. बारामतीत उद्या मतदान आहे. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार गटाची काल सभा पार पडली. या सभेतही शरद पवार पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच शरद पवार यांनी या सभेत भाषणही केले. शरद पवार कुटुंबियांकडून सदस्यांकडून यंत्रणेचा आढावा घेत आहेत.
शरद पवार यांना डॉक्टरांनी दोन दिवस भाषण करु नका, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता कुटुंबिय शरद पवार यांची काळजी घेत आहेत. तसेच आता मतदान आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असला तरी शरद पवार मतदानाचा आढावा आपल्या कुटुंबियांकडून घेत आहेत.शरद पवार हे सातत्याने प्रचारसभांमध्ये भाषण करत आहेत. विशेष म्हणजे राज्यात सध्या उन्हाचा कडाका आहे. या उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. असं असताना शरद पवार हे स्वत: प्रचारसभांमधून संबोधित करत होते. त्यामुळे उन्हाचा आणि धावपळीचा फटका शरद पवार यांना बसला आहे. शरद पवार यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय.
अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द
8 months ago
No Comments