अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाची जिल्हा नूतन कार्यकारणी जाहीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षांपूर्वी संपूर्ण भारतात योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ नावाने संघटनेची स्थापना झाली. या संघटनेची कार्यकारणी संपूर्ण उत्तर भारतासह महाराष्ट्रात देखील स्थापन करून योगशिक्षकांच्या हितासाठी आणि योग विषयाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सेवाकार्य सुरु झाले.

दि. ०२ मे रोजी शहरातील निर्धार योग प्रबोधिनीच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी राज्य समितीच्या वतीने प्रा.कृणाल महाजन आणि जळगावच्या माजी जिल्हाध्यक्षा हेमांगिनीताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत संघाच्या २ वर्षाच्या कार्याचा आढावा आणि नवीन सभासदांना प्रा.कृणाल महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हेमांगिनी सोनवणे ताईंनी नवीन कार्यकारणी घोषित केली. त्याची पदे पुढील प्रमाणे..

यंदा योगशिक्षक सुनील मधुकर गुरव यांची जळगाव जिल्हाध्यक्ष तर ॲड.स्वाती निकम यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष – वैशाली भारंबे, महासचिव – पांडुरंग सोनार, सचिव – विजय जाधव, संयुक्त सचिव – सीमा पाटील व सागर साळी, संघटन सचिव – चित्रा महाजन, मीडिया सचिव – सुभाष तळेले, सोशल मीडिया सचिव – सोनाली पाटील, कार्यालय सचिव – डॉ.भावना चौधरी आदी मान्यवरांची निवड झाली तर सदस्य म्हणून अर्चना सुनिल गुरव, नेहा सुभाष तळेले, सुषमा सोमवंशी, रुपाली ठाकूर, नीलिमा लोखंडे, ज्योती पटेल, भारती सोनवणे, ललिता झंवर, निलेश वाघ, रोहन चौधरी, दिपाली कोल्हे इत्यादींची निवड करण्यात आली.

तज्ञ सल्लागार म्हणून योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे, अरविंद सापकर आणि कृणाल महाजन यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी नाशिक विभाग प्रमुख राहुल (अंबादास) येवला यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले आहे. तद्नंतर राज्याचे अध्यक्ष . मनोज निलपवार यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र सर्व सभासदांना प्राप्त होणार आहे.

 

Protected Content