जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले

पुरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी १३ जून रोजी मंगला आरतीवेळी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी त्यांच्या मंत्रिमंडळासह पुरीचे खासदार संबित पात्रा आणि बालासोरचे खासदार प्रताप चंद्र सारंगी उपस्थित होते. दरवाजे उघडल्यानंतर सर्वांनी मंदिराची प्रदक्षिणा केली.

सीएम माझी यांनी सांगितले की, आम्ही बुधवारी १२ जून रोजी पहिल्या कॅबिनेट बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन आज सकाळी साडेसहा वाजता सर्व दरवाजे उघडण्यात आले. मंदिराच्या विकासासाठी 500 कोटी रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने मंदिराचा घोडा दरवाजा (उत्तर दरवाजा), वाघ दरवाजा (पश्चिम दरवाजा) आणि हस्ती दरवाजा (दक्षिण दरवाजा) बंद करण्याचे आदेश दिले होते. फक्त सिंह दरवाजा उघडा होता, ज्यातून भाविक मंदिरात ये-जा करत असत. त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी आणि लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक दिवसांपासून भाविकांनी सर्व दरवाजे उघडण्याची मागणी केली होती.

Protected Content