दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग; सात जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा दारूच्या नशेत एकाने विनयभंग करून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सात जणांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी ४० वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. ३१ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महिला घरात एकट्या असतांना छोटू (पुर्ण नाव माहित नाही), गुलामनबी पठाण, शाहरूख जाकीर पठाण, नाशा पठाण, रा. कसाली मोहल्ला, समिर सईद पठाण, अबीदा खा मोहम्मद खान पठाण, अमीर रईद पठाण रा. शाह आलम नगर अमळनेर यांनी बेकायदेशीर घरात प्रवेश करून महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे. 

Protected Content