जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव येथील बसस्थानकाजवळ एका 50 वर्षी प्रौढाचा मृतदेह आढळून आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मयताची ओळख पटली असून तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत महिती अशी की, प्रल्हाद पुना सोनवणे (वय-५०, रा़ जैनाबाद) हे मानसिक रूग्ण असल्यामुळे ते कधी-कधी घरी तर कधी-कधी घराबाहेरच राहत आहे. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास प्रल्हाद यांचा मृतदेह विदगाव बसस्टॉपजवळ नागरिकांना आढळून आला. त्यांनी तालुका पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी अरूण सोनार व शैलेश चव्हाण यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली़ मृतदेह कुणाचा हा प्रश्न असताना पोलिसांनी कोळन्हावी येथील पोलीस पाटलांनी मृतदेहाचा फोटो पाठविला. त्यानंतर काही वेळातच मृतदेहाची ओळख पटली व प्रल्हाद सोनवणे असे त्या मयत व्यक्तीचे नाव समोर आले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते़ यावेळी नातेवाईकांनी व कुटूंबियांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ उन्हात फिरल्यामुळे उष्माघातमुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज नातेवाईक व पोलिसांनी वर्तविला आहे.