Home Cities जळगाव सीए फायनल परीक्षेत अक्षता चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण

सीए फायनल परीक्षेत अक्षता चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या फायनल परीक्षेचा निकाल लागला आहे. सीए फायनल दोन्ही कोर्स ग्रुपमधून जळगावातील अक्षता बाळकृष्ण चौधरी ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

जळगाव शहरातून सी ए फायनल परीक्षेच्या कोर्समध्ये दोन्ही ग्रुप मधून जळगावांतून १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी अक्षता बाळकृष्ण चौधरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. अक्षताचे वडील सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता बाळकृष्ण चौधरी मूळचे किनगाव येथील रहिवासी असून ते भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे राहतात. अक्षताची आई मनीषा चौधरी, गोपाळ चौधरी, शालिनी चौधरी, डॉ. दिनेश ब-हाटे, मिलन ब-हाटे, चेतन चौधरी, भूमिका चौधरी, अर्चना तळेले, गणेश तळेले, सूरज चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound