
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील सामाजिक कार्यकर्ते अकिलोद्दीन नसिमोद्दीन शेख यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या यावल शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत ही निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली अकिलोद्दीन शेख यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पक्षात महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शेख यांच्या निवडीचे स्वागत जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, जळगाव जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अब्दुल हमीद शेख, तसेच मारूळ येथील सैय्यद जावेद अली जनाब, लोकनियुक्त सरपंच सैय्यद असद अली जावेद अली, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, यावलचे माजी नगरसेवक समीर मोमीन, माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी, उमेश जावळे, अमोल भिरुड, अभय महाजन, अनिल जंजाळे, धीरज कुरकुरे, नईम शेख व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले.
या निवडीनंतर शेख यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “पक्षाच्या नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”



