जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ. सचिन कुंभार यांच्या “अण्णाभाऊ साठे यांचे आर्थिक विचार” या शोध निबंधास अखिल भारतीय अर्थशास्त्र परिषदेतर्फे मानाचा डॉ. ज. फा. पाटील पुरस्कार प्राप्त झाला असून रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन डॉ. कुंभार यांना गौरविण्यात आले.
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले डॉ. सचिन कुंभार यांनी चांदुबजार येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेत “अण्णाभाऊ साठे यांचे आर्थिक विचार” या विषयावर शोध निबंध सादर केला. यांच्या या शोध निबंधास अखिल भारतीय अर्थशास्त्र परिषदेतर्फे मानाचा डॉ. ज. फा. पाटील पुरस्कार प्राप्त झाला असून रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन डॉ.कुंभार यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. सचिन कुंभार यांच्या यशाबद्दल लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील व डॉ. पी. एन तायडे यांच्यासह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनोद नन्नवरे, प्रा. निलेश कोळी, प्रा. ज्योती पाटील, प्रा. कोमल चौधरी आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापकवृंदांनी अभिनंदन केले.