एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त देशमुख मढीवर प्रतिवर्षाप्रमाणे दि, २० ते २७ जुलै या कालावधीत अखंड हरिनाम संकीर्तन व श्रीमद संगीतमय भागवत कथेच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं आहे.
ह.भ.प. विजय महाराज भामरे (अध्यक्ष श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान) यांच्या प्रेरणेने या सप्ताहात नामांकित कीर्तनकारांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे
पहिल्या दिवशी हं.भ.प .श्याम सुंदर महाराज सौंदाणे यांचे कीर्तन होणार आहे तर ह.भ.प. विष्णु महाराज निरधे (आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या सप्ताहात सकाळी काकड आरती, दुपारी श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन याप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रंमाचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन देशमुख मढी पंच व संत सांवता महाराज सप्ताह समितीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान बुधवार, दि. २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक शहरातून वाजत गाजत निघणार आहे.