इटानगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात थांबून अजितदादांनी अरुणाचल प्रदेशात डंका वाजविला आहे. राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांना विजयाचा झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजितदादांनी महाराष्ट्रात थांबून अरुणाचल प्रदेशात डंका वाजविला आहे. अजित पवार अरुणाचल प्रदेशात प्रचाराला गेल्याच्या बातम्या आल्या नाहीत.
अजित पवार लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात प्रचार करत होते, तरी देखील त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत मिळवून सत्ता खेचून आणली आहे. याच आघाडीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सामील आहे.
अरुणाचल प्रदेशातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयामागे स्थानिक राजकारणाच आहे. स्थानिक उमेदवारांनी स्वतंत्रपणे तडजोडी करून केवळ पक्ष चिन्ह घ्यायचे म्हणून घड्याळ चिन्ह घेऊन ते निवडून आले आहेत. अजित पवार तिथे प्रचाराला गेले नव्हते. तरीदेखील तिथल्या स्थानिक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर, पण स्वबळावर अरुणाचल विधानसभेत विजय मिळवला आहे.